काष्टीच्या धनश्री पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्षा - कलेक्शन एजंट पती पत्नीस अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ३४ लाखांचा गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असणारे संस्थेच्या अध्यक्षा ज्योती रमेश गवळी व त्यांचे कलेक्शन एजंट पती रमेश सर्जेराव गवळी यांना गुरूवार दि.७ रोजी पोलिसांनी हडपसर, पुणे येथून अटक केली आहे या पतसंस्थेत काही दिवसांपूर्वी ३४ लाखांचा गैरव्यवहाराचा प्रकार घडला होता. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संस्थेचा चेअरमन असणारी पत्नी व याच सहकारी पतसंस्थेचा कलेक्शन एजंट असणारा त्या चेअरमन महिलेचा पति या दोघांनी मिळून अनेक सभासदांना लाखो रुपयांचा गंडा घातला होता. ठेवीदारांनी मुदतीनंतर त्यांचे पैसे परत मागीतले असता.त्यांना पैसे देण्यास नकार देत, आर्थिक फसवणूक करून त्यांनाच पुन्हा सावकारी गुन्ह्यात अडकवण्याची हे ठकसेन पती पत्नी धमकी देत होते.

ठेवीदार अंबादास भानुदास राहिंज रा.काष्टी यांनी या फसवणुकी विरोधात श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार करून दाद मागितली होती. श्रीगोंदा पो निरीक्षक बाजीराव पोवार यांनी देखील तात्काळ या पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व संचालक मंडळ तथा कलेक्शन एजंट. या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या त्यानुसार गुरूवार दि.७ रोजी श्रीगोंदा पोलिसांनी या संस्थेच्या चेअरमन सौ.ज्योती रमेश गवळी, व कलेक्शन एजंट रमेश सर्जेराव गवळी या दोघा पती पत्नीस हडपसर पुणे येथून अटक केल्याची माहिती पो.निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.