उसाच्या भावाचा तिढा; लोणीत शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील लोणी येथे शेतकरी संघर्ष समितीने उसाला रास्त ३५०० रूपये भाव मिळावा या करिता आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतकऱ्यांनी पद्मश्री डॉ. विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या उसाची पहिली उचल यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. मात्र, कारखान्यांकडून पहिल्या उचलीपोटी दोन हजार ३०० रुपये प्रमाणे दर देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही संघर्ष समितीला हा तोडगा मान्य झाला नाही. त्यामुळे संघर्ष समितीने आज लोणीत आंदोलन सुरू केले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राज्यातील ११ जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत उसाची पहिली उचल तीन हजार ५०० रुपये मिळावी, यासह उपपदार्थांच्या नफ्यात ५० टक्के वाटा मिळावा, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. २१ कार्यकर्ते उपोषणास बसले आहे. दिवंगत कॉम्रेड नेते गोविंद पानसरे यांचे जावई बन्सी सातपुते हेही उपोषणात सहभागी झाले आहेत. संभाजी ब्रिगेडनेही उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.

आंदोलन कुणा व्यक्ती विरोधात नसून सरकारविरोधी.
राज्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्यावी, या मागणीसाठी सुकाणू समितीने लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली असताना शेकडो आंदोलक पुतळ्यासमोर थेट महामार्गावर उपोषणाला बसले आहेत. हे आंदोलन लोणी सुरू केले म्हणजे कुणा व्यक्ती विरोधात नसून सरकारविरोधी आहे. आमचे भांडण सरकारशी आहे, असे सुकाणू समितीचे अजित नवले यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.