जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे होणार सुलभ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनुसुचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय)अधिनियम 2000 अन्वये सक्षम अधिकाऱ्यांव्दारे प्रमाणपत्र देणेबाबत येंणाऱ्या अडचणींचा व सामान्य जनतेस सतत होणाऱ्या त्रासाचा विचार करून खासदार दिलीप गांधी यांनी जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत नियमात सुधारणा करणेबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राज्य शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्र देणेबाबत सुसुत्रता आणण्यासाठी नियमात ऊचित बदल करून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तसंबंधातील वडीलांचे/सख्खा चुलत्याचे किंवा वडीलांकडील रक्त संबंधीत कोणत्याही नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते वैध धरून व महत्वाचा पुरावा मानुन इतर कोणत्याही पुराव्याची मागणी न करता अर्जदार व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करणेबाबत दि. 24 नोव्हेबर 2017 अन्यवे आदेशित केलेले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

यामुळे सर्व सामान्य नागरिकास जात पडताळणी त्याचे प्रमाणपत्र मिळविणे सुलभ होणार आहे. हा महत्वपुर्ण निर्णय घेणेबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून यश मिळवण्याबाबत खा दिलीप गांधी यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.