मोठा संघर्ष करत अखेर कारखाना सुरु करण्याचा शब्द पाळला - डॉ.सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यासह जिल्हयाचे लक्ष लागून असलेला व राहुरीच्या इतिहासाला सुवर्ण पान जोडणारा क्षण अखेर आला असून तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2017-18 च्या 58 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 09 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे यांनी दिली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत माहिती देताना डॉ.सुजयदादा विखे यांनी सांगीतले की, तालुक्याच्या जनतेने मोठया विश्वासाने कारखान्याचे संचालक मंडळ निवडून दिले. निवडणुकीत मी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरु करेल, असे आश्वासन सभासदांना दिले होते. त्यानुसार गेल्या दीड वर्षापासून कारखाना सुरु करणेसाठी मी व संचालक मंडळाने मोठा संघर्ष करत सर्व गोष्टी जुळवत आणत अखेर कारखाना सुरु करण्याचा शब्द पाळला असून याकामी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांचेसह सर्व संचालक मंडळ, आदिंचे मोठे सहकार्य लाभलेले आहे. 

कारखान्याच्या सन 2017-18 च्या 58 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार दिनांक 09 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते तसेच आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ.शालिनीताई विखे पाटील आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम गायकर यांचे तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरअध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

त्यामुळे तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व हितचिंतक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.सुजय विखे पाटील, डॉ.तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे यांसह संचालक मंडळाने केले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.