अपघाताचा बनाव करून दोघानी पावणेचार लाख लांबविले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेतून दूध संकलन केंद्र चालकाने दुधाच्या पगाराची रक्‍कम घेतली. त्याच्यावर दोघांनी पाळत ठेवून त्या केंद्रचालकाच्या चारचाकी वाहनाचा दुचाकीवरून पाठलाग केला. टाकळीभाननजीक त्याचे चारचाकी वाहन थांबताच त्या दोघांनी अपघाताचा बनाव केला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
हेल्मेटने चारचाकी वाहनाची काच फोडून गर्दीचा फायदा घेत 3 लाख 88 हजाराची बॅग घेवून श्रीरामपूरच्या दिशेने पोबारा केला. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशीरा सुरू होते.

टाकळीभान येथील छत्रपती दूध संकलन केंद्राचे संचालक विश्‍वास (पांडू) सावळेराम कोकणे हे दुधाचे पेमेंट काढण्यासाठी श्रीरामपूर येथील स्टेट बॅंकेत गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोकणे पैशाची बॅग घेऊन त्यांच्या चारचाकी वाहनाकडे आले. त्यांना वाहनाचे मागचे चाक पंक्‍चर झाल्याचे दिसून आले.टायर ट्युबलेस असल्याने तेथून निघून ते मोरगे हॉस्पीटलजवळ थांबले. तेथे त्यांनी चाक पंक्‍चर काढले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नंतर ते टाकळीभानकडे निघाले. सायंकाळी 5.30 च्या दरम्यान ते टाकळीभान येथील खंडागळे वस्तीजवळ आले. तेथे ते कोहिनूर वेल्डींग या दुकानात त्यांचे वाहन लॉक करून गेले. पाठलाग करणाऱ्या चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत रस्त्यावर अपघाताचा बनाव केला. त्यातील एकाने गर्दीच्या विरुद्ध बाजूने जाऊन डोक्‍यातील हेल्मेटसह काचेला धडक मारली व पैशाची बॅग पळविली.

गर्दी कमी होताच कोकणे गाडीत बसले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत टाकळीभान दूरक्षेत्रात खबर देण्यात आली. मात्र गुन्हा नोंदविण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात जाण्याचे आदेश देण्यात आले. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.