प्रवरा नदीचा कालवा फुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातली शेती पाण्याखाली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  प्रवरा नदीचा डावा कालवा फुटल्याने श्रीरामपूर तालुक्यातली शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलीय. नांदूर गावात हा कालवा फुटलाय. भंडारदरा धरणातून सध्या शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलं होतं. या पाण्यामुळे भागात ऊसतोडीलाही मोठी अडचण होणार आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जलसंपदा विभागाने कालव्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यानेच हा कालवा फुटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.दरम्यान धरणाकडून कालव्याद्वारे येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही हे पाणी थांबण्यासाठी २० तास लागतील. त्यामुळे पुढील २० तास ही शेती पाण्याखालीच राहणार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके वाहून गेली आहेत. पुढील सुमारे २० तास हे पाणी सुरुच राहिल्यास शेतीचे मोठे नुकसान होणार असून, अनेकांची जमिन या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणार असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.