श्रीगोंद्यात चोरांच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावाच्या शिवारात शिंदेवाडी येथील संदीप भानुदास शिंदे यांच्या राहत्या घरी मंगळवारी रात्री चोरी झाली. या चोरीत ३१ हजार ४०० रुपयांचे सोने लंपास करण्यात आले असून, चोरट्यांच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत संदीप भानुदास शिंदे(रा. शिंदेवाडी, बेलवंडी) यांनी बेलवंडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही नेहमी प्रमाणे राहत्या घरात झोपलो होतो. शेजारच्या खोलीत आजी इंदूबाई लहानु शिंदे या झोपल्या होत्या. मंगळवारी(दि.५) रात्री २ वाजेच्या सुमारास काही अज्ञात चोरटे आजी झोपलेल्या खोलीत शिरले. 

त्यांनी इंदूबाई शिंदे यांना काठीने जबर मारहाण करून ३१ हजार ४०० रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. चोरांनी केलेल्या मारहाणीत इंदूबाई या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

याबाबत संदीप शिंदे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी रात्री विभागीय पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, बेलवंडी पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.