इमामपूर घाटात दरोडेखोरांच्या टोळीकडून पोलिसांवर चाकू हल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-औरंगाबाद रोडवरील इमामपूर घाटात मंगळवारी (दि. ५) रात्री दरोडेखोरांची टोळी पकडण्यास गेलेल्या पोलिस पथकावर दरोडेखोरांनी चाकू हल्ला केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून या टोळीतील चौघांच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या यावेळी दरोडेखोर व पोलिस पथकात झालेल्या झटापटीनंतर काही दरोडेखोर चारचाकी वाहनासह पसार झाले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, मंगळवार रात्री दरोडेखोरांची टोळी दरोड्याच्या तयारीत इमामपूरघाट येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुप्त बातमीदारामार्फत समजली. त्या आधारे पोलिस पथकाने इमामपूरघाट परिसरात नियोजनबद्ध सापळा रचून या टोळीला घेरले असता, या टोळीतील दरोडेखोरांनी पोलिस पथकावर चाकू हल्ला केला.

यावेळी पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखून चाकू हल्ला परतविला तर चौघांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये अट्टल दरोडेखोर अभिमान शिवदास पवार (रा. वडजी पैठण) सारस विठ्ठल काळे (रा. राहडगाव, पैठण) प्रवीण अर्पण भोसले (रा. देऊळगाव, श्रीगोंदा) आणि सचिन रुस्तुम चव्हाण (रा. निपाणी जळगाव, पाथर्डी) यांना पकडून त्यांच्याकडून चाकू, कटावणी, लाकडी दांडके, अशी हत्यारे जप्त केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

यावेळी इतर दरोडेखोर चारचाकी वाहनातून पसार झाले. यातील अभिमान पवार आणि सारसकाळे हे दोघे अट्टल दरोडेखोर असून त्यांच्या विरुद्ध औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री, करमाड, पाचोडा, पैठण येथे १२ दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. दरोडेखोरांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त असल्याने चाकूहल्ला फेल होवून चारचाकी वाहनात बसलेले चोरटे पळून गेले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.