आमदार मोनिका राजळेंच्या अनुपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लोकनेते गोपीनाथ मुंडे, राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त लिटल चॅम्प अंजली नंदिनी गायकवाड भगिनींच्या स्मृतिगंध कार्यक्रमाला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तथापि, आमदार मोनिका राजळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राजीव राजळे मित्रमंडळाने जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले. आमदार मोनिका यांनी दु:खातून बाहेर पडून राजकारण समाजकारणात सक्रीय व्हावे, यासाठी हिंमत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील आठवड्यात कार्यकर्त्यांनी कासार पिंपळगावला जाऊन मोनिका राजळेंना सप्ताहात सहभागी होण्याची विनंती केली होती.

सकारात्मक मान डोलावत त्यांनी येण्याचे मान्यही केले होते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला राजीव राजळेंच्या जीवनावर व्हिडीओ दाखवण्यात आला. मुख्य गायनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी राजळे कुटुंबातील जि. प. सदस्य राहुल राजळे, नेवाशाच्या सभापती सुनीता गडाख आल्या. आमदार मोनिका येणार नसल्याचे लक्षात येताच काही कार्यकर्ते महिला कार्यक्रम सोडून गेल्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

आमदार मोनिका राजळे यांच्याबाबत शहर तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली असून त्या राजकारण समाजकारणात कधी सक्रीय होतात याकडे लक्ष लागले आहे. हिंमत सप्ताहाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याबरोबरच त्यांनी बाहेर पडावे, यासाठी कार्यकर्त्यांकडून विनंती केली जात आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Blogger द्वारा समर्थित.