समता व स्वातंत्र्यता डॉ.बाबासाहेबांच्या घटनेने मिळाले -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले. त्यांच्या अथक प्रयत्नाने समता, स्वातंत्र्यता, समता व बंधुत्वाची मुल्य रुजविणारी घटना असतित्वात आली. समता व स्वातंत्र्यता डॉ.बाबासाहेबांच्या घटनेने मिळाल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.विधाते बोलत होते. याप्रसंगी संजय झिंजे, उबेद शेख, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, रेखा जरे पाटील, सारंग पंधाडे, अमित खामकर, गौतम भांबळ, प्रा.बबन गाडेकर, संजय सपकाळ, अजय दिघे, उमेश भांबरकर, सागर शिंदे, प्रा.सोपान कदम, प्रा.रविंद्र पटेकर, अरुण खिची आदि उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

प्रा.विधाते पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी परदेशात उच्च शिक्षण घेवून, मोठ्या पदाची नोकरी मिळवली असती. मात्र दीन दलितांच्या उध्दारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. डॉ.बाबासाहेब नसते तर मोठा प्रश्‍न चिन्ह भारतापुढे उभा राहिला असता. या महामानवास आ.अरुण जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, आ.संग्राम जगताप व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.