सामाजिक कार्याबद्दल शिवरुद्र संस्थेला जयरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील पोखर्डी येथील शिवरुद्र बहुद्देशीय संस्थेस उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल जयरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. रयत प्रतिष्ठान व जय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष डॉ.भगवान चौरे, दत्तात्रय जाधव, गणेश शिंदे, राजेंद्र धाडगे, भाऊ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी अ‍ॅड.प्रशांत साळुंके, गुलाबराव खरात, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, अशोक थोरे, अ‍ॅड.भानुदास होले, अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड.अनिता दिघे, पोपट बनकर आदि उपस्थित होते.

डॉ.भगवान चौरे यांनी संस्थेला मिळालेला पुरस्कार एका व्यक्तीचा नसून, संस्थेच्या सर्व सदस्यांचा आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेची पुरस्कारासाठी दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान आदि विविध सामाजिक उपक्रम नगर तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आले. या संस्थेत वरील सदस्यांसह संपत चौरे, दत्तात्रय भगत, भारत मगर विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. संस्थेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.