राधाकृष्ण विखेंना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : 7 डिसेंबर रोजी ३५०० रुपये ऊस दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लोणी येथे पद्मश्री विखे पाटील पुतळ्या समोर उपोषणास बसणार आहेत. याला माझा पाठिंबा असल्याचे डॉ अशोक बाळासाहेब विखे पाटील यांनी अहमदनगर लाईव्ह24 शी बोलताना सांगितले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सभासदांनी प्रवरेत जन्माला येऊन पाप केले आहे का ? 
प्रवरा कारखान्याने एफ आर पी प्रमाणे दर दिला नाही. मागील गळीत हंगामातील ३०० रुपये प्रति टन दिले नाहीत आणि चालू हंगामाची पहिली उचल किती देणार हे अद्याप जाहीर केले नाही. विरोधी पक्षनेत्यांने स्वतः च्या ताब्यातील कारखान्यातर्फे सभासदांना कमी भाव दिला आहे. त्यांना शेतकरी व सभासदांच्या प्रपंचाचे देणे घेणे राहिले नाही. सभासदांनी प्रवरेत जन्माला येऊन पाप केले आहे का ? 

मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा 
प्रवरेच्या बळीराजाच्या घामाचे दाम हिरावून घेणारे हे विरोधी पक्षनेते राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय न्याय मिळवून देणार आहेत ? असा सवालही त्यांनी केला असून ऊस दरासाठी प्रवरा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला पाहिजे. पद्मश्री विखे पाटील व लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचाराशी बांधील राहून मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

...त्यांना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही !
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दर मिळालाच पाहिजे. यासाठी मी या लढ्यात शेतकऱ्यांच्या बाजूने उतरलो आहे.7 डिसेंबर रोजीच्या लोणी येथील उपोषण आंदोलनात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे ही विनंती.
डॉ अशोक बाळासाहेब विखे पाटील यांनी केली आहे.

 शेतकरी एक जुटीचा विजय असो आणि तो होणारच 
शासनाने एफ आर पी प्रमाणे भाव निश्चित केलेला असताना विरोधी पक्षनेते हे शासनाचे प्रतिनिधी आहे त्यांना शासनाचे उस दर नियम पाळायचे नाही. तरी त्यांना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी विरोधी पक्षनेते पद व आमदारकींचा राजीनामा द्यावा. शेतकरी एक जुटीचा विजय असो आणि तो होणारच याचा मला विश्वास आहे.- डॉ अशोक बाळासाहेब विखे पाटील 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.