जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर- सोलापूर राज्य महामार्गावरून बेकायदेशीररित्या जनावराचे मांस घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. या अघातात टेम्पोचालक व क्लिनर जखमी झाले. तर टेम्पो पलटी होऊन त्यातील मांस रस्त्यावर पडले. अपघातग्रस्त टेम्पोमध्ये अंदाजे 10 ते 12 क्विंटल जनावरांचे मांस असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------

हा अपघात रात्री साडेनऊ ते आकरा वाजेच्या सुमारास राज्य महामार्गावरील बाभूळगाव खालसा शिवारात घडला. याबाबतची माहिती अशी की, एच.16 ए. वाय. 9080 हा टेम्पो नगरहून सोलापूरकडे जनावरांचे मांस घेऊन चालला होता. या वाहनाने बाभूळगाव खालसा शिवारात मिरजगावच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला (क्रमांक नाही) जोराची धडक दिल्याने टेम्पो पलटी झाला. 

या अपघातात टेम्पोचालक व क्लिनर जखमी झाले. तर टेम्पोतील सुमारे दहा ते बारा क्विंटल मांस रस्त्यावर पडले होते. पोलिसांनी महामार्गावरून आलेल्या पिकअप क्रमांक एम.एच.16 ए.एन.4062 व दुसऱ्या एका रिकाम्या टेम्पोत ( क्रमांक नाही) मांस भरून मिरजगाव पोलिस दुरक्षेत्रात आणले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
येथे आल्यावर पोलिस कर्मचारी सदर वाहनांतून उतरले असता, दोन्ही वाहन चालकांनी मांसासह वाहने पळवून नेली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश भानुदास कालणे यांच्या फिर्यादीनुसार अपघातग्रस्त टेम्पोसह तिन्ही वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मांस घेऊन जाणारा आयशर टेम्पो अन्नू कुरेशी रा. झेंडीगेट, अहमदनगर यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अपघातात टॅक्टर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास कर्जतचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे. कॉ. सुरेश बाबर, दत्तात्रय कासार, दहिफळे आदी करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.