श्रीगोंद्यात शासकीय कार्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जमिनीची मोजणी केली ज़ात नसल्याच्या कारणावरून तालुक्यातील काष्टी येथील सुनीता बापूराव पालकर या महिलेने दि.२४ नोव्हेंबर रोज़ी भूमिअभिलेख कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी काल दि. ५ डिसेंबर रोज़ी भूमिअभिलेख कार्यालयाचे सहाय्यक उपअधीक्षक विजय आत्माराम राठोड यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील सुनीता बापूराव पालकर ही महिलेन दि.२४ नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा येथील भूमी अभिलेख कार्यालयात ज़ाऊन सहाय्यक उपअधीक्षक राठोड यांना घारगाव, ता श्रीगोंदा येथील गट नंबर 208,224 ची मोजणी का झाली नाही, असे विचारले होते. त्यावर राठोड यांनी कर्मचारी आल्यावर चौकशी करून सांगतो, असे सांगितले. याचवेळी राठोड यांना रॉकेलचा वास आल्याने त्यांनी ज़वळ ज़ाऊन पाहिले असता, या महिलेने अंगावर रॉकेले ओतून घेतल्याने निदर्शनास आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावले. तोपर्यंत ही महिला सरकारी दवाखान्यात गेल्याचे समजले. त्यावेळी राठोड यांनी याप्रकाराबाबत दि.२४ नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा पोलिसांना पत्र दिले होते. परंतु आज दि. ५ डिसेंबर रोजी सुनीता बापूराव पालकर रा. काष्टी यांच्या विरोधात सहाय्यक उपअधीक्षक विजय आत्माराम राठोड यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पो. ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.