राजकारणातील राजहंस म्हणून स्व. राजीव राजळे यांचे नाव इतिहास विसरणार नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :समाजातील लोकशिक्षक, ग्रामीण भागापासून ते देशपातळीवरील विचारवंत व शास्त्रांचा सखोल अभ्यास ठेवणारा नेता आणि राजकारणातील राजहंस म्हणून स्व. राजीव राजळे यांचे नाव इतिहास कधी विसरू शकणार नाही, असे मत डॉ. सुभाष शेकडे यांनी व्यक्त केले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
माजी आमदार राजीव राजळे यांच्या ४९ व्या जयंतीनिमित्त श्री हरिहरेश्वर कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष शेकडे बोलत होते. या वेळी बोलताना शेकडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांकडून ज्याप्रमाणे युध्दनीती आणि आमदार राजीव राजळे यांच्याकडून राजनिती कशी करावी, राजकारणात पुढे कसे जावे, एका चंद्रामुळे पृथ्वीवरील सर्व अंधार दूर होतो; परंतु अनेक तारके असतानादेखील त्याचा उपयोग होत नाही.

पृथ्वीवरील अंधार घालविण्याची शक्ती चंद्रामध्ये आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपली ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेत त्यामध्ये यश संपादन करून जीवनातील अंधार दूर केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना वर्तमानपत्रांची नियमित वाचन असावे, राज्यसेवा, लोकसेवा परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी मराठी, इंग्रजी विषयांचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
स्पर्धा ही ज्ञानाची करावी, पैशाची करू नये, कुठलीलही नोकरी करताना त्यामध्ये कमीपणा वाटू देऊ नये, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे हे न्यायालयात पट्टेदार म्हणून नोकरी करत होते; परंतु ज्ञानाच्या जोरावर मुख्यमंत्री व देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहचले. या वेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दादा मरकड उपस्थित हौते. प्रास्ताविक शरद घनवट यांनी केले. सुनील क्षीरसागर यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.