'त्या' आठ गाळ्यांची एक रुपयात होणार खरेदी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :थकीत कर मालमत्ताच्या वसुलीपोटी महापालिकेने सावेडीतील रासनेनगरमधील आठ गाळ्यांचा लिलाव आज केला. पण, लिलावाला प्रतिसाद मिळाला नसल्याने हे गाळे महापालिकेने नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थायी समितीकडे लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
निवृत्ती मारूती रासने यांचे रासनेनगरमधील आठ गाळे आहेत. प्रत्येकी ८० हजार रुपये, असा कर या आठ गाळ्यांचा थकला आहे. एकूण सुमारे सहा लाख ४० हजार रुपयांची वसुली होती. महापालिकेने या वसुलीसाठी संबंधितांना वारंवार नोटिसा बजावल्या. त्यावर मात्र, संबंधितांकडून प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेने शेवटी मार्चमध्ये हे गाळे सील केले. यावर पुन्हा संबंधितांना कर भरण्याची सूचना केली. पण, प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी महापालिकेने या गाळ्यांचा लिलाव जाहीर केला. हे लिलाव आज होणार होत. पण, कोणीही यात सहभागी झाले नाही. गाळे असलेल्या जागवर जाऊन देखील खरेदीदार मिळाला नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
प्रशासनाने शेवटी हे गाळे महापालिकेच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीत झालेल्या ठरावाचा यासाठी आधार घेतला आहे. केवळ एक रूपया शुल्कात ही कारवाई होणार आहे. महापालिकेला हे गाळे नावावर करून घेण्याच्या कारवाईला बराच वेळ जाणार आहे.

या दरम्यान संबंधितांनी मालमत्ता कर भरल्यास ते पुन्हा संबंधितांना देता येतील, अशी माहिती प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांनी सांगितली.लिलावच्या कारवाईला प्रतिसाद न मिळाल्याची दखल महापौर सुरेखा कदम यांनी देखील घेतली. या कारवाईत उपायुक्त विक्रम दराडे, कर निरीक्षक संजीव उमाप, वसुली लिपीक संजय ताथेड आदी सहभागी झाले होते. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.