तलवारीने केक कापल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी येथील शनि शिंगणापूर रोड हॉटेल शाकंभरी समोर गोटुंबा आखाडा येथे वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन तरुणांना जेलची हवा खावी लागली.या तरुणांना वाढदिवस चांगलाच महागात पडल्याची ही घटना काल रात्री घडली.

संदिप मच्छिंद्र बाचकर (वय २८, रा. गोटुंबा आखाडा, जिल्हा परिषद शाळेसमोर), दीपक नाथा शिंदे (वय २४, रा.सडे रोड गोटुंबा आखाडा), रविंद्र अशोक लबडे (वय २९, रा.गोटुंबा आखाडा) या तरुणांनी शनि शिंगणापुर रोड लगत गोटुंबा आखाडा येथे असलेले हॉटेल शाकंभरी समोर वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा केला. तलवारीने केक कापताना वाढदिवसाचे फोटो व्हॉट्स ॲपवर काही हौशी तरुणांनी व्हायरल केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
याची माहिती राहुरी पोलिस ठाण्यातील अजय खंडागळे यांनी पोलिस प्रमुखांना दिली. पोलिस प्रमुखांनी तत्काळ पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांना संबंधीत तरुणांना शोधून गजाआड करण्याचा आदेश धाडला. वरील तरुणांचा शोध घेेत गोटुंबा आखाडा येथे राहत्या घरातुन रात्री त्यांना ताब्यात घेत पो. कॉ. निलेश सतिश मेटकर यांनी आर्म ॲक्ट प्रमाणे कारवाई करत या तीन्ही तरुणांना गजाआड केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.