आ. राहुल जगताप यांच्या प्रयत्नाने श्रीगोंद्याला ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा येथे सध्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी आ. राहुल जगताप यांनी पाठपुरावा केला असून, या ग्रामीण रुग्णालयाच्या २ एकर जागेत सुमारे साडे अकरा कोटी रुपये खर्च करून आद्यावत असे तीन मजली उपजिल्हा रुग्णालय केले जाणार असून, त्यामध्ये मुख्य इमारत आणि निवासस्थानाचे बांधकाम केले जाणार आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
आ. राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक यांनी अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये बोलविलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पाडून मोकळ्या होणाऱ्या दोन एकर जागेत ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालय आणि निवास स्थानासाठी तीन मजली इमारत बांधण्याचा निर्णय तातडीने राबविण्यासाठी श्रीगोंद्याच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गौतम बनकर यांनी तातडीने प्लन- इस्टीमेट तयार करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग बुरुटे यांनी दिले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

आ.राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडूरंग बुरुटे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीगोंदाचे उपकार्यकारी अभियंता गौतम बनकर, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संघर्ष राजुळे, ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य प्रा. तुकाराम दरेकर व अख्तर शेख, बापूराव सिदनकर उपस्थित होते.

बांधकाम चालू असेपर्यंत श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय पर्यायी जागेत सुरु ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असेही डॉ. बुरुटे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.