मारहाण प्रकरणी एकास सक्तमजुरीची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेतावरील बांधाच्या वादातून झालेल्या मारहाणप्रकरणी बाळू नाना बेंद्रे यास कर्जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. माळवदे यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील फिर्यादी तारामती बाबासाहेब बेंद्रे व त्यांचे पती दि.12-11-2011रोजी शेतामध्ये काम करत असताना बाळू नाना बेंद्रे व त्याचा भाऊ दत्तू यांनी बांधावरील दगड काढण्याच्या कारणावरून बाबासाहेब बेंद्रे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
त्या वेळी फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, बाळू याने फिर्यादी तारामती बाबासाहेब बेंद्रे यांच्या डाव्या हातावर मारहाण केली तसेच ज़ीवे मारण्याची धमकी दिली होती. मारहाणीत तारामती बेंद्रे यांचा डावा हाथ मोडला होता. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पाठविले होते. या प्रकरणातील आरोपी दत्तू बेंद्रे हे प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मयत झाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
आरोपींविरुद्ध सरकार पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले. त्यापैकी फिर्यादी, जखमी पती, साक्षीदार व डॉक्टर यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बाळू नाना बेंद्रे (वय 34) यास दोषी धरून भादंवि कलम 325 करिता 1 वर्ष सक्तमजुरी व कलम 323 करिता 6 महिने सक्तमजुरी, कलम 506 करिता 6 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगावयाच्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.