जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न - ना. शालिनीताई विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शालेय जीवनापासूनच प्रवरेत शिक्षणासाठी दाखल होणाऱ्या मुला- मुलींच्या कलागुणांना वाव दिल्यानेच त्यांच्यातील सुप्त गुणांचा सर्वांगिण विकास होतो. म्हणूनच जगातील अनेक देशात कला, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रात प्रवरेतील मुले काम करीत आहे. प्रवरेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, असे आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
प्रवरानगर येथील प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे चौथे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी ना. शालिनीताई विखे बोलत होत्या. कृषिभूषण बन्सी तांबे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक के.पी. आहेर, ज्ञानदेव म्हस्के, ब्रिलियंट बर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका धनश्री विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, तांत्रिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शरद रोकडे, माध्यमिक विभागाचे प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. मनोज परजणे, प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य सयाराम शेळके, उपप्राचार्य गोडगे, सैनिकी स्कूलचे प्राचार्य सुधीर मोरे, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संगिता देवकर, सनी विखे आदी यावेळी उपस्थित होते. डायरेक्टर कर्नल सुरेंद्र कुमार सिंग यांनी स्वागत केले. प्राचार्या संगीता लोखंडे यांनी विद्यालयाच्या वार्षिक प्रगतीची माहिती दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
ना. शालिनीताई विखे म्हणाल्या, सहकारातून समाजाचा सर्वांगिण विकास साधला जावा यासाठी पद्मश्री विखे पाटील यांनी १९६२ साली ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया घातला. आज ४२ हजार मुलांना शिक्षण देणाऱ्या या शिक्षण संकुलात पूर्व प्राथमिकपासूनचा शालेय जीवनातच पुस्तकी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील कल शोधून त्याप्रमाणे कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील सर्वांगिण शिक्षणाच्या सुविधा प्रवरेने निर्माण केल्या आहेत. 

असे सांगताना शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण शाळा महाविद्यालयाबरोबरच भव्य आणि सुसज्ज क्रीडांगणे, विविध पुस्तकांनी परिपूर्ण ग्रंथालये, ऑलम्पिक दर्जाचे जलतरण तलाव, कला अकादमी, क्रीडा प्रबोधनी आदींसह विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास व्हावा यासाठी वर्षभर राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पी. के. गागरे यांनी आभार व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.