“ग्रीन लिस्ट’मधील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 152 कोटी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रीन लीस्टमध्ये समाविष्ट असणाऱ्या 42 हजार लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर 1 डिसेंबर अखेर 152 कोटी वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्यांचे पडताळणीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, जिल्ह्यातील उर्वरित 3 लाख 34 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून 3 लाख 76 हजार ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. राज्यात सर्वात जास्त अहमदनगर जिल्ह्यातून अर्ज भरण्यात आले असून, 24 जुलै ते 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत होती.

सरकारकडे ऑनलाइन यंत्रणा नसल्याने पारंपरिक चावडी वाचन प्रक्रियेवर यावे लागले. कर्जमाफी अर्जांचे चावडी वाचन गावकऱ्यांकडून करण्यात आले होते.शेतकऱ्यांनी भरलेले अर्ज कर्जमाफीसाठी पात्र आहे की नाही, अशा अर्जांची फेरतपासणी आता शासनाकडून केली जात आहे. आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होण्याची शक्‍यता वाढली आहे.

दीड लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज शासनाने माफ केले. नियमित कर्जदारांना 25 हजारांपर्यंत सूट दिली. त्यामुळे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात येत आहे, असे अनेकवार सांगण्यात आल्याने तांत्रिक अडचणींवर तसेच इंटरनेट, सर्व्हरसह अनेक गोष्टींवर मात करत शेतकऱ्यांनी अर्ज भरले. मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यातील 42 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, उर्वरित 3 लाख 34 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार केव्हा ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अर्ज डाऊनलोड करून गावात जाऊन त्याची माहिती जमा केली आहे. अर्जदार लाभासाठी पात्र आहे की नाही? अर्जात भरलेली माहिती सत्य आहे का ? अशी सर्वच माहिती गावातूनच घेत होते. त्यानंतर चावडी वाचन करून ती सर्व माहिती गावकऱ्यांसमोर सादर करून त्यांच्याकडूनही खात्री करीत होते. 

त्यानंतर यादीच्या शेवटच्या पानावर सर्व माहितीचा पंचनामा करण्यात येत होता. त्यावर सरकारी अधिकाऱ्यांसह सरपंच, प्रतिष्ठित व्यक्तींची स्वाक्षरी घेण्याचे आदेशित करण्यात आले होते. त्यानंतर पडताळणी अधिकाऱ्यांना आवश्‍यक वाटल्यास सूचना देत तो संपूर्ण अहवाल तालुकास्तरीय समिती सदस्यांकडे सादर करण्यात आला होता. त्याची पोहोच घेण्याचेही स्पष्ट देण्यात आले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.