नितीन आगे खून खटल्यातील फितुरांविरोधात कारवाईचा प्रस्ताव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यात फितूर झालेल्या साक्षींदारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे कारवाईचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड. रामदास गवळी यांनी दिली. नितीन आगे खून प्रकरण हे राज्यभर गाजले होते. या खटल्याचा निकाल नुकताच लागला. सबळ पुराव्याअभावी आणि फितूर साक्षीदांरामुळे हा खटल्यातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
रामदास गवळी म्हणाले, 'या खटल्यात २६ साक्षीदार तपासले आहेत. यात १६४ नुसार काहींचे जबाब नोंदविले आहेत. काही जण नुसते साक्षीदार आहेत.' खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजात १३ साक्षीदार फितूर झाले. यात फौजदार संहितेच्या तरतुदीतील १६४ प्रमाणे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविल्याचा समावेश आहे. 

सुमारे आठ जणांचा १६४ नुसार जबाब आहे. हे आठही जण फितुरांच्या यादीत आहेत, असे ॲड. गवळी यांनी सांगितले. अशोक नन्नवरे, रावसाहेब ऊर्फ बबलू अण्णासाहेब सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, सदाशिव मुरलीधर दाडर, विष्णू गोरख जोरे, राजेंद्र बाजीरावर गीते, बाळू ज्ञानेश्वर जोट, रमेश भगवान काळे या आठ साक्षीदारांचे १६४ नुसार जबाब आहेत, तर सदाशिव अश्राबा वडशीळ, विकास कचरू दांडर, हनुमंत परमेश्वर मिसाळ, राजू सुदाम जाधव, साधना मारूतीराव खडरे यांची देखील साक्ष आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या १३ जणांनी आपले जबाब न्यायालयात फिरवले आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फितूर घोषित केले आहे. या फितूर साक्षीदारांविरुद्ध १९३ नुसार कारवाईचा प्रस्ताव नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करणार असल्याचे ॲड. गवळ यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.