काष्टीत चारीच्या कामावरून दोन गटांत हाणामारी , दंगलीचा गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चारीच्या कामावरून तालुक्यातील काष्टी येथे दि. ३ रोज़ी दोन गटांत दगड व काठयांनी तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दाखल केलेल्या परस्पर फिर्यादीवरून पोलिसांनी १८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविला असून,सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
याबाबतची माहिती अशी की, दि. ३ रोज़ी काष्टी शिवारात घोड कालव्यावरील डी.वाय. १७ चारीचे काम चालू असताना पाईपलाईन फुटल्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या वेळी दगड व काठयांचा सर्रास वापर करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
याबाबत शिवाजी दादा राहिंज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडू राहिंज, कल्याण राहिंज, सतीश राहिंज, तुकाराम राहिंज, प्रेमराज राहिंज, बाबासाहेब राहिंज, रोहित राहिंज, राजाराम राहिंज यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर कल्याण राहिंज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनकर राहिंज, विलास राहिंज, महेश राहिंज, प्रल्हाद राहिंज, गणेश राहिंज, किरण राहिंज, सुनील राहिंज, संतोष राहिंज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.