पालकमंत्री राम शिंदेना जिल्ह्याचा विकास नको,पक्षीय राजकारणामुळे अडविला जिल्हा परिषदेचा निधी ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षीय राजकारणामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर नियोजन समितीने निर्णय घेतला नाही, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नियोजन समितीची अद्याप सभाच झालेली नाही.
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने १५ कोटींचा सुधारित प्रस्ताव नियोजन समितीला पाठविला आहे. परंतु, पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या नियोजन समितीची अद्याप सभाच झालेली नाही.सभेसमोर जिल्हा परिषदेचा विषय अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. 

पालकमंत्री - जिल्हा परिषद वाद भविष्यात रंगणार !
सदर निधीवरून पालकमंत्री विरुध्द जिल्हा परिषद असा वाद भविष्यात रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
जिल्हा परिषद निवडणुका होवून एक वर्ष होत आले असून गेल्या दहा महिन्यांत एकही मोठे काम नव नियुक्त सदस्य करू शकले नाहीत. निधीअभावी सदस्यांची कामे खोळंबली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------

सदस्यांनी अध्यक्षांकडे केली न्यायालयात जाण्याची  मागणी. 
मागीलसभेत सदस्यांनी निधीचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले आहेत. परंतु, पालकमंत्र्यांनी याबाबत ठोस निर्णय दिला नाही. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निधीसाठी न्यायालयात जाण्याची मागणी सदस्यांनी अध्यक्षांकडे केली होती. त्यापूर्वी इतर जिल्हा परिषदांना निधी दिला आहे किंवा नाही, याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने मागविली आहे. 

निधी जिल्हा परिषद सदस्यांना की आमदारांना ?
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी यापूर्वी आमदारांना मिळत होता. चालूवर्षीही हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी आमदार आग्रही आहेत. पण, या निधीवर जिल्हा परिषदेने दावा केला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद विखे यांच्याकडे आहे. त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला आहे. पालकमंत्र्यांशीही चर्चा केली. पण, निधी देण्याबाबत निर्णय होत नसल्याने हा निधी जिल्हा परिषद सदस्यांना की आमदारांना मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.