एलजी कंपनीचा हा स्मार्टफोन करेल डासांपासून संरक्षण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जगभरात सर्वाधिक मृत्यू डासांमुळे होणार्‍या रोगांपासून होतात असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. दरवर्षी डासांच्या चाव्यामुळे होणार्‍या रोगांमुळे सरासरी ४ लाख मृत्यू होतात. अशा वेळी स्मार्टफोन जर तुमचे डासांपासून संरक्षण करणारा असला तर? ही केवळ कल्पना नाही तर स्मार्टफोन उत्पादक एलजी ने असा खास स्मार्टफोन एलजी के ७ आय नावाने बाजारात आणला आहे. या प्रकारचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या स्मार्टफोनमध्ये साऊंड वेव्ह टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. यामुळे कोणत्याही रासायनिक प्रक्रियांशिवायच डासांना दूर पळविले जाते. या फोनमध्ये ३०किलो हर्टझचा आवाज निर्माण करणारा जनरेटर बसविला गेला आहे. माणसाला या आवाजाचा कांहीच त्रास होत नाही मात्र डासांना या तीव्रतेचा आवाज सहन होत नाही. यामुळे ७० टक्के डास हा फोन वापरणार्‍या युजरच्या जवळ येणार नाहीतच पण बाकीचे मरून जातील असा कंपनीचा दावा आहे. फोनच्या बॅककव्हरवर हे मच्छर भगाअ्रो फिचर दिले गेले आहे. याला रिफिल करण्याची आवश्यकता नाही.

हा फोन बाकी कामे अन्य स्मार्टफोनप्रमाणेच करतो. त्याला ५ इंची डिस्प्ले दिला गेला असून तो फोरजी व्होल्ट फोन आहे. त्याला ८ एमपीचा रियर,५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून इंटरनल मेमरी १६ जीबी आहे. मायक्रो कार्डच्या सहाय्याने ती वाढविता येते. या फोनची किंमत आहे ७९९० रूपये.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.