शिर्डी - विवाह समारंभातून १ लाख ३० हजारांची चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर-मनमाड रोड लगत पार पडलेल्या विवाह समारंभातून नवरदेवाच्या भावाची १ लाख ३० हजार रुपयांच्या पैशांची पिशवी चोरीला गेली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीमुळे लग्नसोहळ्याला काही प्रमाणात दुःख आणि चिंतेचे गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. 


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शहरात व परिसरात सध्या असलेल्या हॉटेल व मंगलकार्यालयात व लग्नसोहळ्याचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यासाठी वधू व वर दोन्ही कुटुंब लाखो रुपये खर्च करत आहेत. मात्र सुरक्षिततेच्या दृष्ठीकोनातून फारशी काळजी घेतली जात नसल्याने नातेवाईकांच्या चुकीमुळे लाखो रुपयांची होण्याचे प्रकार वाढलेले आहेत.त्यामुळे अगोदरच कमी असलेली मनुष्यबळ वाढती गर्दी त्यातच वाढणारे शिर्डीत शुभविवाह सध्या पोलिसांना डोकेदुखी ठरत आहेत.

आशिष प्रकाश शर्मा यांच्या भावाचे नगर-मनमाड रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये १ डिसेंबर रोजी विवाह व सायंकाळी होणार होता. यावेळी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास सोफा सेटवर ठेवलेली काळ्यारंगाची पिशवी कोणीतरी चोरून नेली. अधिक तपास पोलीस कर्मचारी मंडलिक हे करीत आहे मंगलकार्यालयात व हॉटेलमध्ये होणाऱ्या या चोऱ्यांच्या बाबतीत काळजी घेण्याबाबत या अगोदर ही आपण सूचना दिलेल्या असल्याची माहिती पो. नि. प्रताप इंगळे यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.