थिंक ग्लोबलचा स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सोहळा १० डिसेंबरला.​

सुरेश वाडकर.
पं. शौनक अभिषेकींच्या “स्वराभिषेक” मैफिलीचे आयोजन, अंजली-नंदिनी गायकवाड देखील गाणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :थिंक ग्लोबल फौंडेशनचा दुसरा स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना नुकताच जाहीर करण्यात आला होता. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या शुभहस्ते वाडकरांना सन्मानित करण्यात येणार आहे. जेष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.​

​रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी माऊली सभागृह येथे सायंकाळी ६.३० वा. हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.​ रु.५१०००, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.गिरणी कामगाराचा मुलगा ते लोकप्रिय गायक म्हणून हिंदी-मराठी चित्रपट,भक्ती, भाव संगीतात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल वाडकरांना थिंक ग्लोबलच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे.
अध्यक्ष किरण काळे.

वाडकरांचे गुरुकुल असणाऱ्या आजिवासन संगीत निकेतनच्या विश्वस्त प्रेम वसंत यांच्यासह राजाभाऊ अमरापूरकर, उमेश पाटील, नाट्य परिषदेचे प्र.अध्यक्ष अॅड. दीपक शर्मा, चित्रपट निर्माते अनिल जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

पुरस्कार सोहळ्या निमित्त प्रसिद्ध गायक पंडित शौनक जितेंद्र ​अभिषेकी​ यांच्या “स्वराभिषेक” या भक्तीगीते व नाट्यगीतांच्या मैफिलीची मेजवानी नगरकर रसिकांना मिळणार आहे. झी टीव्ही सारेगमपाची विजेती ​अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड​ या देखील यावेळी गाणी सादर करणार आहेत. चित्र–शिल्पकार प्रमोद कांबळे हे सुरेश वाडकर यांचे यावेळी लाईव्ह स्केच रेखाटणार आहेत.

​सोहळ्याचा आणि मैफिलीचा आनंद नगरकरांना लुटता यावा यासाठी फौंडेशनने पुढील केंद्रांवर विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत. १)आदेश्वर रेडीमेड॒स, प्रोफेसर चौक २)नक्षत्र बुक डेपो, कुष्ठधाम रोड, सोना नगर चौकाजवळ ३)श्रीराम मेडिकल, श्रीराम चौक, पाईपलाईन रोड ४)नक्षत्र सायबर कॅफे, दीक्षित मंगल कार्यालयाजवळ, दिल्लीगेट ५)नक्षत्र बुक डेपो, भोला जिमवर, शनी चौक ६)नक्षत्र बुक डेपो, न्यू आर्ट्स कॉलेज होस्टेल समोर, बालिकाश्रम रोड.​

​या केंद्रांवरून सकाळी १० ते रात्री ८.३० यावेळत रसिकांनी प्रवेशिका घ्याव्यात, असे आवाहन अध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.​ रेडिओ सिटी ९१.१ एफ.एम. हे या कार्यक्रमासाठी रेडीओ पार्टनर आहेत. साईदीप हॉस्पिटल, एलआयसी, ओरिएन्टल इन्सुरन्स, नोबल हॉस्पिटल, बँक ऑफ महाराष्ट्र हे सोहळ्याचे प्रायोजक आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.