भगवानबाबांच्या संपत्तीवर काहींचा डोळा. - नामदेव महाराज शास्त्री.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रसंत भगवानबाबा हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान होते, त्यामुळे त्यांच्या नावाने पार पडलेल्या ऐंशी हरिनाम सप्ताहांपैकी चाळीस सप्ताहांचे नियोजन मराठा समाजाने केले. सर्वधार्मीयांना सोबत घेण्याचे काम भगवान बाबांनी सातत्याने केले आहे, असे प्रतिपादन न्यायाचार्य नामवदेव महाराज शास्त्री यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथे उभारलेल्या मंदिरामध्ये श्रीविठ्ठलाच्या मूर्तीसह राष्ट्रसंत भगवानबाबा, वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते करण्यात आली, या वेळी ते भाविकांसमोर बोलत होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमानिमित्त डमाळवाडी येथे आलेल्या शास्त्री महाराजांचे ग्रामस्थांनी घरासमोर गुडी उभारून व सडा रांगोळया काढून स्वागत केले. या वेळी मोठया संख्येने महिला- पुरूष उपस्थित होते. या वेळी नामदेव शास्त्री म्हणाले, राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी अविरत दु:ख , त्रास सहन केला. मात्र, त्यांनी आयुष्यभर संत विचारांनीच मार्गक्रमण केले. 

भगवान गडाची स्थापना वयाच्या ५३ व्यावर्षी बाबांनी केली. गडावर जवळपास बारा वर्षे बाबा राहिले. भगवान गडाचे काम अर्धवट ठेवून त्यांनी वामनभाऊंचा गड पूर्ण करण्यासाठी मदत केली. आळंदी ज्ञानेश्वरांच्या नावाने, देहू तुकाराम महाराजांच्या नावाने तर पैठण एकनाथांच्या नावाने ओळखले जाते. तसच भगवानगड देखील केवळ भगवानबाबांच्याच नावाने ओळखला जावा, इतर कोणाच्याही नावाने नव्हे. भगवानबाबांचा मठ सोडून इतर मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीवर काहींचा डोळा आहे म्हणून भाषणबंदीच्या नावाखाली ओरड केली जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
भाषण बंदी नंतर गडावर अनेक जातीधर्माच्या लोकांची गर्दी वाढली आहे. बाबा आणि गडाचा इतिहास व काही गोष्टी तरुणांना माहीत नाहीत, त्यामुळे त्यांचा अनेकवेळा गैरसमज होतो, असे शास्त्री या वेळी म्हणाले. राष्ट्रसंत भगवानबाबा गड हा सर्वांचा असून, येथील साधनसंपत्ती गडाची म्हणजेच जनतेचीच आहे. येथे मी वाचनची भूमिका बजावतोय, त्यामुळे इथली वाटी घेतली तरी अन् कोणी वाटा मागितला तरी मला राग येतो,असे सांगत नामदेव शास्त्री यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या.

 या वेळी हरेश्वर देवस्थानचे महंत भगवान महाराज मचे, संतोष महाराज गीते, नीळकंठ आव्हाड, उपसरपंच अंबादास डमाळे, विक्रम डमाळे, अंबादास शिरसाठ, ठकाजी डमाळे (सर), गोरख डमाळे, गणेश पोटे, भानुदास डमाळे, आदिनाथ पोटे, सुरेश सानप, गोपीनाथ शिरसाठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.