मतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका मतीमंद मुलीवर एकाने अत्याचार केल्याची घटना गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते १.२० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून .
--------------------------------
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घारगाव याठिकाणी ही मतीमंद मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते १.२० वाजेच्या सुमारास घरी एकटीच होती. त्यावेळी गिताराम भिल हा तिच्या घरी आला.

त्याने घरी कोणी नसल्याचा व तिच्या मतीमंदपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करुन फरार झाला. ही बाब त्याच दिवशी अत्याचारीत मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर अत्याचारीत मतीमंद मुलीच्या आईने रविवारी घारगाव पोलीस ठाण्यात येवून गिताराम भिल याच्या विरोधात फिर्याद दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
तिच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गु.रजि.नं.१३१/२०१७, भादंवि कलम ३७६ (२) (एल)नुसार त्याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्या हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.