आदिवासी विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विद्यार्थ्यांना मिळणारी अपमानास्पद वागणुक तसेच निकृष्ट जेवणाला कंटाळून पाइपलाईन रोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग करुन सुरु केलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सायंकाळपर्यंत सुरू होते. या आंदोलनास चर्मकार उठाव संघाने पाठिंबा दिला आहे. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, आदिवासी युवा संघटनेचे अध्यक्ष महेश शेळके, गौतम सातपुते, नगरसेविका प्रतिभा भांगरे, प्रकाश पोटे, सुनिल केदार, विलास भारमळ, सागर भांगरे, विशाल देवके, शंकर लांघी, नितीन साबळे, अभिजीत भांगरे, हिरामण पोपेरे हे आंदोलनात सहभागी झाले होते.

शहरात जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट पध्दतीचे जेवण व अपमानास्पद वागणुक मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. वसतिगृहाच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. मनमानी कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता.

चर्मकार उठाव संघटनेचे अध्यक्ष अशोक कानडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधून विद्यार्थ्यांची बाजू मांडली. विद्यार्थ्यांच्या अडचणी न सोडविल्यास संघटना या आंदोलनात भाग घेईल, असा इशारा यावेळी कानडे यांनी दिला.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.