कोपर्डीतील आरोपींसाठी खोटा फोन करणाऱ्या संशयितास पुण्यात अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना अर्ध्या तासात येरवड्यात हलवा. मी मुख्यमंत्र्याचा खासगी पीए बोलतोय. त्यानंतर पेालिस महासंचालकाच्या नावाने नगरच्या कारागृह अधीक्षकांना तोतयाने फोन करुन आदेश दिले. ही घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी सहा वाजता झाली. जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात तोतया विरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हे फोन बोगस व तोतयागिरी करणारे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तुरुंग अधीक्षक नागनाथ सावंत यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, या प्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकाने एका संशयितास पुण्यातून अटक केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.