शाओमीचा हा फोन जिओ देत आहे अवघ्या ३९९९ रुपयात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चिनी कंपनी शाओमीने भारतातील आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन रेडमी ५ ए लॉन्च केला आहे. चिनी कंपनीचा हा स्मार्टफोन ‘मेक इन इंडिया’ असून ज्याचे नाव ‘देशाचा स्मार्टफोन’ असे आहे. या फोनची किंमत ५९९९ रुपये आहे, पण रिलायन्स जिओसह हा स्मार्टफोन केवळ ३९९९ रुपयात खरेदी करू शकता. तथापि, कंपनीने त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी नवीन “ऑल अनलिमिटेड” प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान केवळ रेडमी ५ ए स्मार्टफोन घेणा-या ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल. हा प्लान घेतल्यानंतर कंपनीकडून १००० रुपये कॅशबॅक आणि १०० रुपयांची १० रिचार्ज व्हाऊचर देण्यात येणार आहेत. 

या व्हाउचरची वैधता १२ महिने असणार आहे. अशा प्रकारे ग्राहकांना २००० रूपयांचा लाभ मिळेल. ही ऑफर केवळ २जी रॅम असलेल्या मॉडेलवर उपलब्ध आहे. ग्राहकांना १९९ रुपयांच्या प्लानमध्ये अमर्यादित डेटा, अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित एसएमएस आणि दररोज १ जीबी ४ जी डेटासह फ्री जीओ अॅप्स मिळणार आहे. या योजनेची वैधता २८ दिवस आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.