तनपुरे कारखाना सुरु करुन संचालक मंडळाने स्व.डॉ.बाळासाहेब विखेंना वाहिली खरी श्रद्धांजली !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लोकनेते पद्मभुषण खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले. डॉ.तनपुरे कारखाना सुरु व्हावा ही त्यांची मनापासुनची इच्छा होती. डॉ.सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरु करुन संचालक मंडळाने त्यांना खरी श्रद्धांजली वाहिलीच आहे. पुढील काळात या राहुरीच्या कामधेनूला गतवैभव प्राप्त करुन देऊन खासदार साहेबांना अपेक्षीत असणारे सभासद कामगारांचे हित जोपासण्याचे काम संचालक मंडळ करेल, असे प्रतिपादन डॉ.बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी केले आहे. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
लोकनेते पद्मभुषण खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमीत्त त्यांना डॉ.बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे वतीने आदरांजली वाहण्यात आली.यावेळी बोलताना चेअरमन उदयसिंह पाटील यांनी सांगीतले की, सामान्य माणसाला न्याय मिळावा, त्याची प्रगती व्हावी यासाठी पद्मभुषण खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी विविध संस्था उभारल्या. अनेक शैक्षणिक संस्था उभारुन शिक्षणाची दारे सामान्यांसाठी उघडे करुन दिली. दवाखाने उभारुन आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या. अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कार्य शब्द अपुरे पडतील, एवढे आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.संभाजी पठारे यांनी सांगीतले की, लोकसभेत काम करत असताना पद्मभुषण खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. अभ्यासु व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात व देशात त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची उदाहरणे आहेत. सामान्यांच्या प्रश्नाची जाण असल्याने ते सोडविण्यात त्यांचा वेगळा हातखंडा होता. त्यांच्या जाण्याने सहकार,शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.यावेळी पद्मभुषण खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन संचालक मंडळाचे वतीने अभिवादन करणेत आले. आभार संचालक विजय डौले यांनी मानले.

यावेळी न्यु आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.संभाजी पठारे, कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, संचालक विजय डौले, शिवाजी सयाजी गाडे, महेश पाटील, अशोक खुरुद,मधुकर पवार, रविंद्र म्हसे, भारत तारडे, उत्तमराव आढाव,बाळकृष्ण कोळसे , दत्तात्रय ढुस, अर्जुनराव बाचकर, नंदकुमार डोळस, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी.एन.सरोदे, श्रीविवेकानंद नर्सींग होमचे प्राचार्य डॉ.कड आदी मान्यवर उपस्थीत होते.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.