हफ्ते भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे हार्दिकने दोन वर्ष लपवली होती गाडी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आयपीएल पदार्पणापूर्वी हफ्ता भरण्यास पैसे नसल्यामुळे आपण आपली गाडी दोन वर्ष लपवून ठेवली असल्याची आठवण टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सांगितली. हार्दिकने यूट्युबवर गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये दिलखुलास गप्पा मारल्या.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हार्दिक पांड्याने यावेळी आयपीलमध्ये पदार्पण करण्यापूर्वीचा संघर्ष आणि आर्थिक त्रास यांच्याविषयी सांगितले. गाडीचे हप्ते भरण्यासाठी त्यावेळी येणारी पै न् पै वाचवावी लागत होती. पाच आणि दहा रुपयांचीही बचत मी करायचो. जवळपास तीन वर्ष मी संघर्ष केला, असे हार्दिक सांगतो.

मला आयपीएलच्यावेळी ७० हजार रुपये मिळाले. आपण आता काही काळ तग धरु शकतो, असे मला वाटले. दोन वर्ष आम्ही हफ्ता भरला नव्हता. आम्ही स्मार्ट होतो. मी आमची गाडी लपवून ठेवायचो, कारण ती हातून जावी, असे मला वाटत नव्हते, अशी आठवण हार्दिकने सांगितली. त्या तीन वर्षात आम्ही कुठलीही नवीन गोष्ट विकत घेण्याऐवजी कारसाठी पैसे वाचवून ठेवले. आमच्यासाठी अन्न आणि कारचे हप्ते या दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या’ असे हार्दिकने म्हटले.

मुंबई इंडियन्सने आयपीएल हार्दिक पांड्याने पदार्पण केले, त्याच वर्षी जिंकली. देव दयाळू आहे. पहिल्याच वर्षी आम्ही आयपीएल जिंकली आणि मला ५० लाख रुपयांचा चेक मिळाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.