एका वर्षात नगर जिल्ह्यात 129 बलात्कार; 80 जणांचे खून.

दिव्य मराठी अहमदनगर :- कोपर्डी अत्याचार खुनाच्या (१३ जुलै २०१६) घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले. त्यानंतर देखील सरते वर्ष २०१७ मध्ये शहर जिल्ह्यात तब्बल १२९ बलात्काराच्या घटना घडल्या. एवढेच नाही, तर चक्क ८० जणांचे खून झाले. संदीप वराळ खून, राहुरी तालुक्यातील हिंमत जाधव खून, शेवगाव येथील हारवणे हत्याकांड, तसेच नुकतेच शिंगणापूर येथील गणेश भूतकर हत्याकांडाने जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे घरफोडी गंठण चोरीचे गुन्हे हे नगर पोलिसांचे सरत्या वर्षातील सर्वात मोठे अपयश असल्याची कबुली खुद्द पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सरत्या वर्षात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील कारवाईची माहिती देताना शर्मा बोलत होते. वर्षभरात शहर जिल्ह्यात तब्बल एक हजार ६०० चाेऱ्यांचे गुन्हे घडले आहे. त्यापैकी केवळ ३२ टक्के गुन्ह्यांचा तपास लागला. घरफोडी, दरोडा गंठण चोरीच्या गुन्हे हे सरत्या वर्षातील पोलिसांचे अपयश असल्याचे शर्मा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वर्षभरात १२९ बलात्कार, ८० खून, ६३ दरोडे, ११४ जीवे मारण्याच्या घटना, दरोडा टाकण्याचा प्रयत्नाच्या ३९ घटना, तसेच गंठण चोरीच्या ८७ घरफोडीच्या २७६ घटना घडल्या असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारी कमी होणार नाही, उलट गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेच राहणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. आतापर्यंत वेगवेगळ्या गुन्ह्यांचे तपास लागले आहे. या तपासाचे प्रमाण ७२ टक्क्यांपर्यंत आहे. पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. २०० ते ३०० नागरिकांमागे एक पोलिस कर्मचारी असणे गरजेचे अाहे, प्रत्यक्षात मात्र ९०० ते १४०० नागरिकांमागे एक पोलिस कर्मचारी आहे. नगरसाठी जवळपास हजार पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

पोलिसांवर अतिरिक्त कामाचा भार
शहरासह जिल्ह्यात पोलिसांवरील कामाचा ताण वाढत आहे. अवैध दारू, गुटखा, सुगंधी तंबाखू, ताडी, व्हिडिओ जुगार अशा अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची नाही. ज्या त्या संबंधित विभागाने या अवैध धंद्यांवर कारवाई केली, तर पोलिसांचा कामाचा ताण नक्कीच कमी होईल. आम्ही आमच्या परीने सर्वच अवैध धंद्यांना अाळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु संबंधित जबाबदार विभागानेही ही कारवाई केली, तर गुन्हेगारीचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.

‘मोक्का’च्या कारवाईचे प्रस्ताव
शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याचबराेबर १०६ जणांच्या विरोधात तडीपारीचे प्रस्ताव दिलेले आहेत. त्यात १० जणांच्या तडीपारीचे आदेश निघालेले आहेत. मोक्काचा एक प्रस्ताव प्रलंबित असून आणखी काही प्रस्ताव पक्क्या पुराव्यांसह सादर करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. नवीन वर्षात गुन्हेगार दत्तक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.