जागतिक मराठी संमेलनाच्या संयोजन समितीत येलूलकर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या जागतिक मराठी संमेलनाच्या संयोजन समितीमध्ये नगरच्या रसिक ग्रुपचे संस्थापक व मसापच्या सावेडी उपनगर शाखेचे कार्यवाह जयंत येलूलकर यांचा समावेश आहे.जगभरातील मराठी बांधवांना एकत्र येण्याची संधी मिळावी म्हणून जागतिक मराठी अकादमीतर्फे हे संमेलन आयोजित केले जाते. यंदाचे पंधरावे संमेलन आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात १ ते ३ जानेवारी या काळात होणाऱ्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रम होतील. त्याचे नियोजन महत्त्वाचा भाग असतो. हे नियोजन करणाऱ्या संयोजन समितीमध्ये श्री. येलूलकर यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांनी जागतिक मराठी अकादमीचे ज्येष्ठ पदाधिकारी रामदास फुटाणे यांचे आभार मानले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात नवे काही घडावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे श्री. येलूलकर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतही काम करतात. संघटनेतर्फे पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम समितीत त्यांचा समावेश आहे. गहुंजे येथे झालेल्या या स्टेडियमच्या निर्मितीत श्री. येलूलकर यांचे मोठे योगदान आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.