दीड महिन्यानंतर दोघा जखमींसह 38 शेतकऱ्यांवर गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ऊस दरवाढीसाठी तालुक्‍यातील खानापूर, घोटण येथे झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी रास्ता रोको करुन आपला उद्रेक व्यक्‍त केला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. तर दहा जणांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्‍तताही केली. या घटनेला आज दीड महिना होत असून शेवगाव पोलिसांनी दोन दिवसापूर्वी गोळीबारात जखमी झालेल्या दोघासह आणि 38 जणांवर रस्ता अडवून जाळपोळ करणे, शासकीय वाहनांची नासधूस करणे व सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे गुन्हे दाखल केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या संदर्भात बाळासाहेब काकडे, दिनकर थोरात, सुनिल राठोड, ज्ञानेश्‍वर भिडे, कल्याण थोरात, विशाल थोरात, जालिदर काकडे, भरत थोरात, गणेश थोरात, राजेंद्र काकडे या दहा जणांवर तेव्हाच गुन्हे दाखल झाले होते. तर आता बाबुराव दुफळे, उध्दव मापारी या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांसह घोटण, खानापूर, गदेवाडी, एरंडगाव, शेवगाव व तेलवाडी ता. पैठण येथील राम गोरे, अण्णा चौधरी, जालिंदर गोबरे, रावसाहेब लवांडे, भागवत चोधरी, जिजा जगधने, ज्ञानेश्वर थोरात, बाळु शिंदे, गणेश पाडळे, आसाराम गोबरे, शिंदे टेर, योगेश चेडे, शिवाजी पाडळे, राजु थोरात, संतोष गुजर, हरिश्चंद्र चेडे यांचा नातू, वसंत चेडे पिठाची गिरणीवाला, बाळू गिरजे, मधुकर थोरात याची नातू, संजय नांगरे, संगिता थोरात, अरुण मोरेची बायको, दामु पैलवान, ज्ञानेश्वर भागवत, बापू भागवत, गोरख लोखंडे, पिंटू मोटकर, उध्दव परदेशी, प्रकाश घुगे, भाऊसाहेब गर्जे, कांता बडे, तुकाराम वल्ले, भागचंद म्हस्के, आदीनाथ घुगे या 38 जणांवर आता कारवाई करण्यात आली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या संदर्भात अधिकारी व कर्मचारी मिळून 19 जणांच्या साक्षी पुरावे झालेले आहेत. यामध्ये तीन अधिकारी, पाच कर्मचारी व अनेक शेतकरी जबर जखमी झाले होते. खानापूर येथे झालेल्या गोळीबारानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, भाजपचे राज्याध्यक्ष रावसाहेब दानवे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आदींनी तालुक्‍यातील जखमी व पिडीत शेतक-यांना भेटून दिलासा दिला होता.

थक्‍क करणारी कारवाई.
गोळीबार घटनेनंतर जखमींना आर्थिक मदतीच्या तसेच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल सर्वांनीच जाहीर वाच्यता केली होती. सत्तारुढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा हवाला देवून शब्द दिला होता. तरीही आता झालेली ही कारवाई थक्‍क करणारी आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्‍त होत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.