शिवसेनेकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी; बडा नेता कोण, याची चर्चा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पथदिव्यांचे कामे झालेली नसताना त्याची ४० लाख रुपयांची बिले परस्पर काढली गेली. या प्रकाराचे मूळ ठेकेदाराकडे आहे. तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. ही बिले काढताना अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या गेल्या आहेत. याची प्रशासकीय पातळीवर चौकशी होईल. परंतु शिवसेना नगरकरांच्या प्रत्येक प्रश्नाला कटिबद्ध आहे. त्यामुळे या गैरव्यवहारातील तथ्य बाहेर येण्यासाठी खाजगी फिर्याद देणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते यांनी दिली. 

महासभेनंतर सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम, माजी सभापती सचिन जाधव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सभागृह नेता गणेश कवडे, अनिल शिंदे, योगीराज गाडे, संजय शेंडगे व नगरसेविका उपस्थित होत्या.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सातपुते म्हणाले, 'स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय पुढे आला आहे. विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी या विषयाला वाचा फोडली आहे. प्रभाग एक आणि २८ मधील हा प्रकार आहे. हा गैरव्यवहार म्हणजे कोणत्या पक्षाशी निगडीत असलेला विषय नाही. तो नगरकरांशी निगडीत आहे. संबंधित ठेकेदाराने हे बिल मंजूर करून घेण्याचे जे धारिष्ट्य दाखविले त्यामागे कोणीतरी राजकीय नेता असल्याचा संशय आहे. त्यामुळे शिवसेना स्वत: पुढाकार घेत खाजगी फिर्याद दाखल करणार आहे.'

सचिन जाधव यांनी सभागृहात हा विषय समोर आल्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी बिलावर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यासाठी खाली बसून घेतले. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना कोणीच पाठीशी घालणार नाही, असेच चित्र आहे. हे काम जो करत आहे, तो राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाचा पदाधिकारी आहे. पैशाचा अपहार केलाच आहे, पण आता घाईघाईने काम करताना महापालिकेच्या हद्दीत विनापरवानगी खोदाई देखील केली आहे. जेवढं खोट लपविण्याचा प्रयत्न होईल, तेवढा तो गुंतत जाणार आहे.

अनिल शिंदे यांनी भ्रष्टाचाराचे कुरण हे विद्युत विभाग असल्याचे सांगितले. उपमहापौर यांनी हे बिल मंजूर करू नका, असा दूरध्वनी कॅफो यांना केला होता. तरी देखील हे बिल मंजूर झाले. ते होण्यामागचे कारण काय याचा देखील शोध पोलीस तपासात पुढे येईल. या गैरव्यवहाराची फिर्याद दाखल झाल्यानंतर यामागे कितीही मोठा नेता असू द्या, तो समोर येईल, असा दावा संभाजी कदम यांनी केला. कदम म्हणाले, 'छोट्या गोष्टींसाठी विरोधक मोर्चा आणतात. पण, आता ज्या प्रभागात प्रकार झाला आहे. तेथील राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वत: पुढाकार घेत संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवावा. नगरकरांविषयी असलेली नैतिकता दाखवावी.'

बजेट रजिस्टरमध्ये कामाची खतावणी नाही. हे बजेट रजिस्टर महापौर यांच्या कार्यालयात असते. या बजेट रजिस्टरची देखील चौकशी झाली पाहिजे. या रजिस्टरमधील काही पाने फाडली गेली आहेत. बिगर खतावणीचे काम होऊच शकत नाही. गैरव्यवहाराचे मूळ हे बजेट रजिस्टर असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेता संपत बारस्कर यांनी केला आहे.

संकेत ओळखले नाहीत : ॲड.आगरकर .
पीठासीन अधिकारी तथा महापौर सुरेखा कदम यांनी अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितल्यावर तो आदेश अधिकाऱ्यांनी तत्काळ मानायला पाहिजे होता. तसा अलिखित नियमच आहे. पण, अधिकाऱ्यांनी हा संकेत पाळला नाही. उलट त्यावरून सभागृहाला वेठीस ठरले. सभागृह सदस्याचा अपमान केल्याची भावना ज्येष्ठ नेते ॲड. अभय आगरकर यांनी व्यक्त केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अजब, हे महापालिका प्रशासन.
स्थायी समितीच्या बैठकीत हा गैरव्यवहार पुढे आल्यानंतर महासभा सुरू असताना प्रभाग एक आणि २८ मध्ये या पथदिव्यांची कामे सुरू झाली. त्याची छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाली. विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी ती सभागृहाला दाखवली. यावरून सभागृहात चांगलाच हसा पिकला. विद्युत विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांनी देखील ही कामे झाली असल्याचा दावा सभागृहासमोर केला. 'अजब, हे महापालिका प्रशासन', अशी प्रतिक्रिया सभागृहातील सदस्यांनी नोंदवली.

सातपुते-वालगुडे 'तू-तू, मैं-मैं'.
महासभा तहकूब झाल्यानंतर ज्या कामात गैरव्यवहार झाला आहे, ती ठिकाणे पाहण्यासाठी दिलीप सातपुते यांनी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे आग्रह धरला. वालगुडे हे मात्र सातपुते यांच्याकडून सुटका करून घेण्यासाठी पळवाट शोधत होते, कारणे सांगत होते. अधिकारी नाहीत. माझा अधिकार नाही, आयुक्त आल्यावर पाहू, अशा कारणांचा त्यात समावेश होता..

...तर महापालिकेत येऊन बसू!.
गजराज फॅक्टरीजवळील रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात सुरू न झाल्यास प्रभागातील नागरिकांसह महापालिकेत येऊ बसू, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत बारस्कर यांनी महासभेत दिला. यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मनपा प्रशासनाने दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.