नगर जिल्ह्यात अच्छे दिन आणण्यासाठी आ.कर्डिलेंचा मंत्रिमंडळात समावेश करा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भाजपला नगर जिल्ह्यात पुन्हा अच्छे दिन आणायचे असतील तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारख्या सलग पाचवेळा आमदार झालेल्या व मराठा समाजाचा नेता म्हणून भाजपने आ. कर्डिले यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा, अशी मागणी जि. प.चे माजी सदस्य मोहनराव पालवे यांनी केली आहे. पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथे आ. कर्डिले यांच्या निधीतून राष्ट्रसंत भगवानबाबा व वामनभाऊ यांच्या मंदिरासमोर दहा लाख रुपये खर्चाचा उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन आ. कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून पालवे बोलत होते. या वेळी पालवे पुढे म्हणाले, शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यामुळे मला अतिशय दु:खी मनाने शिवसेना पक्ष सोडावा लागला. आज तालुक्यात पक्षाची काय अवस्था आहे,असा प्रश्न उपस्थित करत पालवे यांनी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा नामोल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. मी भाजपचा नाही. मात्र, आ. कर्डिले यांना विकास कामांचा मोठा अनुभव असून, त्यांचे विकासकार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
भाजपला नगर जिल्ह्यात पुन्हा अच्छे दिन आणायचे असतील तर आ. कर्डिले यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे सांगत वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाला गती देण्याची गरज असल्याचे पालवे या वेळी म्हणाले. आ. कर्डिले म्हणाले राजकारणात जय पराजय सुरूच असतात. 

मी देखील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालो होतो. त्यामुळे मोहनराव पालवे यांनी खचून न जाता लोकांच्या सुख दु:खात सहभागी झाले पाहिजे. रस्त्यावरचा पुढारी म्हणून आजही पालवे यांची ओळख आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पालवे यांच्याकडून थोडी घाई झाली नसती तर त्यांनाच भाजपची उमेदवारी द्यायची होती. यावर राजळे व मी ठाम होतो, असा खुलासा या वेळी आ. कर्डिले यांनी केला. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.