पैशाच्या कारणावरून महिलेस मारहाण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भिंगार येथे पैशाच्या कारणावरून महिलेस मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी कि, फिर्यादी आशा रामू साठे (रा.इंदीरानगर झोपडपट्टी,भिंगार ) यांनी आरोपी सागर अजित काळे ( रा.इंदीरानगर भिंगार ) याच्या कडून 3 लाख रूपये घेतले होते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तीन लाख रूपये फिर्यादीस मागितले असता तुझे माझ्याकडे काहीच पैसे नाहीत असे म्हणत तुझा माझा काही संबंध नाही असे म्हणाल्याचा राग येवून आरोपी सागर काळे याने फिर्यादीस शिवीगाळे करत दमदाटी करून लाथाबुक्कयांनी मारहाण करून टणक वस्तू फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीजवळील बोटास मारल्याने दुखापत होवून फॅक्‍चर केल्याप्रकरणी आरोपीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.