अडीच-अडीच वर्षे निधी पडून राहतो, याचे मनस्वी दुःख.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील पालिका,आमदार, मंत्री या सर्वांना तोंड देवून निधी खेचून आणताना प्रसंगी टपाल घेवून दालना- दालनामध्ये फिरावे लागते. एवढे दिव्या पार करून आणलेला निधी अडीच- अडीच वर्षे पडून राहतो, याचे मनस्वी दुःख होते. हे सर्व बंद करा, हेवेदावे बाजूला सारा, हे टिमवर्क आहे. सामंजस्याने एकत्र येऊन पाठपुरावा करा, आता प्रलंबित प्रश्न व्यवस्थित हाताळुन मार्गी लावा, असे आवाहन करीत हाक द्या, सोबत येईन, अशी ग्वाही आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
आ. कोल्हे यांनी आज नगरपालिकेत तब्बल तीन तास मॅरेथॉन बैठक घेवून विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी आ. कोल्हे यांनी 42 कोटीची शहर पाणीपुरवठा योजना, विस्तापितांचे पुर्नवसन, 3 कोटीचे 6 रस्ते, खोका शॉप, तुळजा भवानी व बाबुशेठ वाणी संकुल गाळे लिलाव, हद्दवाढीचा प्रस्ताव, अखर्चित दलित वस्ती सुधार निधी पुर्नजीवन, कामगार वसाहत, पंतप्रधान आवास योजना, महिला स्वच्छता गृह, निळवंडे पाणीपुरवठा योजना, एस.टी बसस्थानक, नगरपालिका व पालिका वाचनालय इमारती, जुने स्थलांतर नवीन बांधकाम, 2 कोटीचे खुले नाटयगृह, पोलीस वसाहत, नवीन पंचायत समिती इमारत, 5 वा जलसाठवण तलाव, रोजंदारी कामगार प्रश्न, आदी कामांची माहिती व आढावा घेतला. या कामातील त्रुटीबाबत चर्चा केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.