महापौर सुरेखा कदम यांच्याकडून 6 अधिकारी निलंबित.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील पथदिव्यांची कामे न करताच मुख्य लेखा परिक्षकांच्या बनावट सहिने तब्बल ४० लाख रुपयांची बिले अदा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज सभेत संबंधीत अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी गदारोळ करून बाहेर हाकलले. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याची घोषणा महापौर सुरेखा कदम यांनी केली.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, मुख्य लेखा अधिकारी दिलीप झिरपत, शहर अभियंता विलास सोनटक्के, उप अभियंता बाळासाहेब सावळे, विभागप्रमुख जितेंद्र सारसर यांना निलंबित करण्यात आले.

शहरातील प्रभाग क्रमांक १ आणि २८ मध्ये पथदिव्यांची कामे न करताच मुख्या लेखा परिक्षकांच्या बनावट सहिने ४० लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले असल्याचा प्रकास काल उघडकीस आला. त्यानंतर आज सकाळीच शहरात पथदिवे उभारणीस सुरुवात झाली. कालच्या सभेत याबाबत कामे झाल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात आज कामाला सुरुवात झाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
काही ठिकाणी ठेकेदाराने रात्रीतून साहित्य आणून टाकले. आज महापालिकेची सभा गोंधळातच सुरु झाली. या घोटाळ््याप्रकरणी संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत निलंबनाची मागणी नगरसेवकांनी केली. संतप्त नगसेवकांनी तीन अधिका-यांनी सभागृहाबाहेर हाकलले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.