अवघ्या काही मिनिटांत फोटो असलेले डेबिट कार्ड देणार स्टेट बँक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आपल्या ग्राहकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने नवी सेवा सुरु केली असून जर तुमच्याकडे स्टेट बँकेचे डेबिट कार्ड आहे, पण त्याच्यावर तुमचा फोटो नाही आणि त्यावर फोटो हवा असेल तर त्यासाठी ही नवी सेवा उपयोगी ठरणार आहे.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तुम्हाला डेबिट कार्डवर फोटो लावण्यासाठी स्टेट बँकेच्या शाखेमध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही अवघ्या काही मिनिटांत फोटो असलेले डेबिट कार्ड प्राप्त करु शकता. तुम्हाला या सुविधेसाठी ठराविक शाखेमध्येच तुम्हाला जावे लागणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण बँकेच्या या शाखा आहेत. आठवडे किंवा महिन्याभरात होणारे काम या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. तुम्हालाही जर फोटो असलेले डेबिट कार्ड हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला sbiINTOUCH शाखेमध्ये अकाऊंट सुरु करावे लागणार आहे. बँकेने यासाठी देशभरातील १४३ जिल्ह्यातील २५७ शाखेला फिजिटल केले आहे. एसबीआयची सुविधा असलेल्या या शाखा कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या ठिकाणी आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.