कोल्हापूरचा जावई करवीर निवासिनीच्या दर्शनाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नुकतेच भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे विवाहबद्ध झाले असून हे नवे दाम्पत्य लग्नानंतर मेहंदी, संगीत यांसारखे विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर कोल्हापूरला जाऊन करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सागरिकाचे कोल्हापूर आणि इंदूर येथील राजघराण्यांशी नाते असल्यामुळे झहीर आता तिच्याशी लग्न केल्यानंतर कोल्हापूरचा जावई झाला आहे. हे नवदाम्पत्य यामुळेच करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहचले. देवस्थान समितीने यावेळी अंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी झहीर-सागरिकाला पाहण्यासाठी लोकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

सागरिका ही अभिनेत्री होण्याआधी राजकुमारी असून एका मुलाखतीत याविषयी सागरिका म्हणालेली की, होय, मी राजकुमारी असून माझे कोल्हापूरमधील घराण्याशी नाते आहे. मी अशा राजघराण्यात जन्माला आल्याने स्वतःला नशीबवान समजत असल्यामुळे मी कोणतीही गोष्ट करताना आमच्या घराण्याच्या इभ्रतीला धक्का पोहचणार नाही याची पुरेपूर काळजी घेते. मी कोल्हापूरची असले तरी माझे बालपण मुंबईतच गेले. त्यानंतर मी बोर्डिंगमध्ये शिकण्यासाठी गेले, असे सागरिकाने सांगितले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.