श्रीगोंद्यात 10 हजार 300 शेतकऱ्यांना कर्जमाफी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा सहकारी बॅंकेच्या श्रीगोंदा शाखेंतर्गत 168 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 26 हजार 864 सभासद आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत 30 नोव्हेंबर 17 अखेर 10 हजार 300 शेतकऱ्यांची कर्जमाफीची 62 कोटी रुपयांची रक्कम मिळाली असून यातील 42 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी दिली.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बॅंकेच्या श्रीगोंदा शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत संचालक दत्तात्रय पानसरे यांनी कर्जमाफी बाबत माहिती दिली. यावेळी तालुका विकास अधिकारी भरत इथापे उपस्थित होते. यावेळी बोलताना पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत श्रीगोंदा तालुक्‍यात पहिल्या टप्प्यात 10 हजार 300 शेतकरी सभासदांचे एकूण 62 कोटी रुपये प्राप्त असून आतपर्यंत 7 हजार 400 सभासदांचे 42 कोटी रुपये कर्जमाफी रक्कम शेतकऱ्यांचे खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम पुढील काळात टप्याटप्याने शासन जमा होईल तशी वर्ग करण्यात येणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.