कोपर्डी प्रकरणातील आरोपींसाठी बनावट फोन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना अर्ध्या  तासात येरवड्यात हलवा. मी मुख्यमंत्र्याचा खासगी पीए बोलतोय. त्यानंतर पेालिस महासंचालकाच्या नावाने नगरच्या कारागृह अधीक्षकांना तोतयाने फोन करुन आदेश दिले. ही घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी सहा झाली. जिल्हा कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात तोतया विरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
बुधवारी (दि. २१) कोपर्डीतील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सायंकाळी सहा वाजता नगरच्या सबजेल कारागृहातील लॅण्डलाईन फोनवर मोबाईलवरुन फोन आला. त्या व्यक्तीने मी मुख्यमंर्त्यांचा खासगी पीए बोलतो, असे सांगून कोपर्डीतील तीनही आरोपींना फाशी झाली, असून तुम्ही त्यांना कारागृहात ठेवले आहे. त्यांना अध्र्या तासात येरवडा जेलला पाठवा. त्यानंतर पुन्हा फोनवर अज्ञात व्यक्तीने मी एसपी बोलता आता आरोपी कोर्टातून निघाले आहेत. त्यांना न थांबता येरवडा जेलला पाठवा असे बोलला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यानंतर रात्री आठ वाजता पुन्हा फोन आला तो फोन तुरुंग अधिकारी शामकांत शेंडगे यांनी घेतला असता त्या इसमाने मी पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्ये बोलतो. तुम्ही आरोपींना ताबडतोब वर्ग करा ते येरवडा जेलमध्ये सुरक्षित राहतील त्यांना नागपूरला पाठवू नका, असे बोलून तोतयागिरी केली. याबाबत सावंत यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.