सहायक आयुक्तांच्या तोंडावर ओतली शाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे यांच्या तोंडावर शाई ओतून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकडे चर्मकार उठाव संघाने लक्ष वेधले. संघाने आज केलेल्या या आक्रमक आंदोलनामुळे शहरातील शासकीय कार्यालयात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, सहायक आयुक्त पांडुरंग सीताराम वाबळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा चर्मकार उठाव संघाचे संस्थापक अशोक नाथा कानडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
अशोक नाथा कानडे (वय ४७, रा. सावेडी), प्रकाश मोहन पोटे (वय ३२, रा. निबोंडी, ता. नगर), लखन भाऊसाहेब साळे (वय २४, रा. अकोळनेर, ता. नगर), विजय जगनाथ घासे (वय ३५, रा. केडगाव, ता. नगर), जालिंदर रखमाजी केदार (रा. केडगाव) या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, त्यातील जालिंदर केदार हा पसार झाला आहे. कानडे, पोटे, साळे व घासे या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करून  न्यायालयासमोर हजर केले होते. या चौघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. 

प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या चौघांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. वाबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, चर्मकार उठाव संघाचा सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयावर अचानक मोर्चा आला. अशोक कानडे यांच्यासह आलेल्या काही आंदोलकांशी कार्यालयात चर्चा झाली. नेवासे तालुक्यातील सुरज दुर्गिष्ट या विद्याथ्र्यासह इतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का देण्यात आली नाही, अशी विचारणा या आंदोलकांनी सुरू केली. पांडुरंग वाबळे यांनी शिष्यवृत्तीची प्रक्रिया ऑनलाईन असल्याचे सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन प्रस्ताव आहे. पण कोषागार कार्यालयाने त्यावर हरकत घेतली आहे. याबाबत विद्याथ्र्याला लेखी उत्तर दिलेले आहे, असे वाबळे यांनी सांगितले. ऑनलाईन प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याकडे वाबळे यांनी लक्ष वेधले. परंतु, शासकीय सुटीमुळे कार्यालये बंद आहेत. दोन तासात शिष्यवृत्तीचे देयके बनवून कोषागार कार्यालयात सादर होतील आणि पुढील कार्यवाही होईल, असे देखील त्यांनी सांगितले.

वाबळे यांच्या या मांडणीवर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. काही कार्यकर्त्यांनी निवेदन घेण्यासाठी कार्यालयालाबाहेर येण्यास भाग पाडले. समाज कल्याण निरीक्षक विलास मोरे यांना बरोबर घेऊन वाबळे आंदोलकांना समोरे गेले. तेथे पुन्हा चर्चा सुरू झाली. चर्चेतून मागार घेत असताना आंदोलकांपैकी काहींनी वाबळे यांच्या डोक्यावर शाई ओतली. ती काहींनी त्यांच्या तोंडाला चोळण्याचा काहींनी प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. 

काहींनी घोषणाबाजी सुरू केली. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहून वाबळे आणि मोरे पुन्हा कार्यालयात आले. कार्यालयातील काहींनी एमआयडीसी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. अशोक कानडे व त्यांच्या साथीदारांनी शासकीय कार्यालयावर अचानक मोर्चा आणून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्यादीत वाबळे यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.