कंटेनर व दुचाकीच्या अपघातात दोन ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील मुंबई- नागपूर महामार्गावरील संवत्सर चौफुलीच्या पुढे लक्ष्मीआई मंदिरासमोर भारत गॅसचा कंटेनर व दुचाकी यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
शनिवार दि. २ डिसेंबर रोजी सायकाळी ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास भारत गॅस कंपनीचा कंटेनर (क्र. एमएच ०४ एफयू ३३१७) वैजापूरच्या दिशेने जात होता तर दुचाकी (क्र. एमएच १७ एयू ६८५२) दहेगावकडून संवत्सरकडे येत होती. त्यांची संवत्सर शिवारातील नागपूर- मुंबई महामार्गावर लक्ष्मीआई मंदिराजवळील वळणावर समोरासमेार धडक झाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यात दुचाकीवरील मच्छिंद्र गौतम मोरे (वय २४) व गणेश सोमनाथ माळी (वय २४, दोघे राहणार मनाईवस्ती, संवत्सर, ता. कोपरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. कंटेनरचालक अपघातस्थळापासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर कंटेनर सोडून पसार झाला. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.