जिल्हा परिषदेच्या ४९ शाळा होणार बंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या ४९ शाळा बंद केल्या आहेत. शिक्षण संचालनालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी शुक्रवारी ही कारवाई केली. पटसंख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १३०० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पटसंख्येअभावी बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये नगर जिल्ह्यातील ४९ शाळांचा समावेश आहे. बंद पाकिटातून हा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. शिक्षण विभागाने मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना बंद करण्यात येणाऱ्या शाळांची नावे कळविण्यात आली असून, या शाळा तत्काळ बंद करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून या शाळांना कायमचेच कुलूप लावण्यात आले आहे. येथील मुलांना इतर शाळांत पाठवले आहे. मागील शैक्षणिक वर्षांत दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळांची संख्या ८९ होती.

चालू वर्षातील वर्गनिहाय पटसंख्या जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आली आहे. तसे पत्रच शिक्षण विभागाने शाळांना दिले आहे. पटसंख्येची माहिती अजून जिल्हा परिषदेलाच मिळालेली नाही.असे असतानाही शिक्षण विभागाने कुठल्या आकडेवारीनुसार या शाळा बंद केल्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
पटसंख्या हा एकमेव निकष लावण्यात आला की आणखी काही निकष आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही अनभिज्ञ आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रगत महाराष्ट्र कार्यक्रमाचा आढावा घेतला होता.

अकोले तालुक्यातील सर्वाधिक १४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील ९ तर संगमनेरमधील ६ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित शाळा जामखेड, नगर, पारनेर, पाथर्डी, राहाता, श्रीगोंदा, श्रीरामपूर तालुक्यातील आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.