श्रीगोंदाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न - आमदार जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मतदारसंघात जी कामे चालू आहेत, ती पूर्ण गुणवत्तापूर्ण चालू आहेत, सर्व गावे रस्त्यांच्या माध्यमातून जोडणार असल्याचे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
मौजे एरंडोली येथील रस्त्याचे आ.जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गावांतर्गत रस्ता प्रजिमा ५५ ते महादेव मंदिर रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेले असून सदर काम आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ९ लाख रूपये मंजूर करण्यात आलेले होते. हा रस्ता गावातील अत्यंत महत्वाचा रस्ता होता या रस्त्याबाबत गावकर्यांनी आ.जगताप यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. 

त्यावर आ.जगताप यांनी तत्काळ कार्यवाही करून रस्ता मजूर करून दिला. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले त्याबद्द्ल गावकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी आ.जगताप यांनी बोलताना म्हणाले, तसेच यापुढेदेखील गावांवर लक्ष ठेवून अशीच कामे करणार आहे.गावातील बाकीचे रस्ते देखील टप्प्या-टप्प्याने पूर्ण करणार असून गावातील विकास कामांसाठी निधी अपुरा पडून देणार नाही अशी ग्वाही दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे, पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे, एरंडोलीचे सरपंच वैशाली इथापे तसेच उपसरपंच संजय इथापे, कुकडीचे संचालक प्रल्हाद इथापे, विवेक पवार, कचरु मोरे, दिलीप इथापे, माजी सरपंच छगन इथापे, बाळासाहेब जगताप, सतिष जामदार, चेअरमन बाळासाहेब इथापे, बाळासाहेब सोनवणे, चेअरमन भाऊसाहेब इथापे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब पठारे, माधवराव इथापे, बाळासाहेब इथापे, शहाजी इथापे, ह.भ.प. मानसिंग महाराज इथापे, शिवाजी महाराज इथापे, विशाल इथापे, सागर जठार, एम. जी. शिंदे, संजय डाके, भाऊसाहेब खेतमाळीस उपअभियंता बनकर साहेब उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.